Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : सावधान : कोरोनाबाधितांच्या आणि मृत्यूच्या संख्येत होते आहे वाढ

Spread the love

मुंबई : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कालच्या तुलनेत राज्यात आज कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून मृतांच्या सख्येतही मोठी वाढ झाली हे. तसेच कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्याही किंचित घटली आहे. गेल्या २४ तासात राज्यात २ हजार ८७६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ४०१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ७६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ८४० इतकी होती. तर, आज ९० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३९ इतकी होती.

आज राज्यात झालेल्या ९० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची स्थिती अशी आहे…

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार १५९ इतकी आहे. काल ही संख्या ३३ हजार ६३७ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ९२९ इतका खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ०१४ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार १८६ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०५५ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार १४९ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९४२ आहे.

सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५,४५१ इतकी आहे या पैकी मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ४५१ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६४७ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६५७, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८१० इतकी खाली आली आहे. नंदुरबार, बुलडाणा, भंडारा आणि गोंदियात प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण असून औरंगाबादमध्ये ४७८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९७ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०२ वर आली आहे. तर नंदुरबार, बुलडाणा, भंडारा आणि गोंदियात या जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १ सक्रिय रुग्ण आहे.

दरम्यान आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९६ लाख १९ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६७ हजार ७९१ (११.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३९ हजार ७६० व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ४१६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!