CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ८३३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सद्यस्थितीत देशात २ लाख ४६ हजार ६८७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. हा गेल्या २०३ दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. दरम्यान मंगळवारी देशात १८ हजार ३४६ नवीन करोना प्रकरणांची नोंद झाली आहे. ही गेल्या २०९ दिवसांतील ही सर्वात कमी नोंद होती. तुलनेने आज हा आकडा वाढलेला दिसतो.
COVID19 | India reports 18,833 new cases in the last 24 hours; Active caseload stands at 2,46,687; lowest in 203 days, as per Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/DLPR1hh7T3
— ANI (@ANI) October 6, 2021
राज्यात मंगळवारी (५ ऑक्टोबर) रात्री आलेल्या आकडेवारीनुसार, २ हजार ८४० रूग्ण करोनामुक्त झाले. तर याच एका दिवसात २ हजार ४०१ नवीन रूग्ण आढळले. या २४ तासांत ३९ रूग्णांना करोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. राज्यात मंगळवापर्यंत एकूण ६३ लाख ८८ हजार ८९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.