Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraElectionUpdate : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी होते आहे मतदान

Spread the love

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जाहीर झालेल्या निवडणुकीनुसार अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली जात आहे. या पोटनिवडणुकीत एकूण ४२ जागांसाठी १८७ उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषद १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागांचा समावेश आहे. या निवडणुकीत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस व प्रहार जनशक्तीपक्ष स्वबळावर लढत असून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढत आहे.

दरम्यान अकोला जिल्हा परिषदेत सत्ता मिळविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्वाधिक ८ जागा ओबीसी आरक्षणामुळे रद्द झाल्या. या जागा पोटनिवडणुकीत राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर आहे. अकोला जिल्हा परिषदेत ५३ सदस्य आहेत. पक्षनिहाय विचार करता वंचित बहुजन आघाडी २२, शिवसेना १२, भाजप सात, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस पाच तर चार अपक्ष सदस्य निवडून आले. यात ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले जिल्हा परिषदेतील १४ आणि सात पंचायत समित्यांमधील २८ सदस्यांचे पद रद्द करण्यात आले. ही रिक्तपदे सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नंतर कोरोना संसर्ग वाढल्याने दोन महिन्यांची स्थगिती देण्यात आली होती. आता संसर्ग कमी झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार हि निवडणूक होत आहे.

असे होत आहे मतदान

अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद निवडणुक विभाग व २८ पंचायत समिती गणात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणूकीत तीन लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये  १ लाख ७७ हजार ६७५ महिला मतदार असून  १ लाख ९४ हजार ०१३ पुरुषसह इतर २ जण मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. असे एकत्रित ४२ जागांसाठी १८७ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस व प्रहार जनशक्तीपक्ष स्वबळावर घडत असून, महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे.

जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिति निवडणुका पार पडले. मात्र, ओबीसीच्या आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयानं ४ मार्च रोजी ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्यानं त्या जागाच रिक्त झाले होते. त्यामुळे २२ जून रोजी पोट निवडणुकीचा निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, ९ जुलै रोजी निवडणूक प्रक्रियेला कोविडमुळे स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आज यासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे..

‘या’ जागांसाठी  होत आहे मतदान

जिल्हा परिषद गट – दानापूर, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगाव, दगडपारवा, शिर्ला, अडगाव बु., तळेगाव बु.. अकोलखेड, कुटासा, लाखपुरी.

पंचायत समिती गण – कुरणखेड, चिखलगांव, निमकर्दा, पारस भाग १ देगाव, वाडेगाव भाग २. दगडपारवा, मोहळ, महान, पुनोती बु., शिलां, खानापूर, आलेगाव, हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, पिंप्री खुर्द, अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपुरी, ब्रह्मी खुर्द, माना, कानडी, दहिहांडा, घुसर व पळसो.

४८८ मतदान केंद्र

जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८८ मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आज ५ ऑक्टोंबर रोजी मतदान व उद्या बुधवार ६ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात – ७७, अकोट तालुक्यात-८१ मुर्तिजापूर – ८३, अकोला – ८५, बाळापूर – ७४, बार्शिटाकळी – ४९ आणि पातूर तालुक्यात ३९ असे एकत्रित ४८८ मतदान केंद्र आहेत.

Click to listen highlighted text!