AurangabadCrimeUpdate : बायको नांदायला येत नाही म्हणून रस्त्यावरील महिलेचे मंगळसूत्र लुटले,चोरटा ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद -जाधववाडी परिसरात रविवारी संध्याकाळी ५च्या सुमारास महिलेला मारहाण करंत मंगळसूत्र चोरणारा रेकाॅर्डवरील चोरटा गुन्हेशाखा आणि हर्सूल पोलिसांनी पहाटे २ वा. ताब्यात घेतला आहे .अटकेची प्रक्रिया सुरु आहे.

Advertisements

तारासिंग विठ्ठल निमरोट(२७) रा.घाणेगाव असे चोरट्याचे नाव आहे.त्याची सासुरवाडी जाधववाडी आहे.बायको नांदायला यावी म्हणून तो प्रयत्न करण्यासाठी सासुसवाडीला गेला होता. पण सासुरवाडीच्या लोकांनी तारासिंगचे म्हणणे न ऐकून घेतल्यामुळे संतापलेला तारासिंग घरी परतंत असतांना रस्त्यात लक्ष्मी माधव काकडे(४५) नावाची महिला त्याला दिसली. दरम्यान बायकोचा राग काकडेबाईवर काढत त्याने त्यांच्या कानशिलात लगावली व त्यांच्या गळ्यातील ९ ग्रॅमचे गंठण हिसकावून पळवले. या प्रकरणी सोमवारी संध्याकाळी ५वा. हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Advertisements
Advertisements

तारासिंग हा अट्टल मोटरसायकल चोर असून सिडको, हर्सूल आणि जवाहरनगर पोलिसांना तो मोटरसायकल चोरीमधे वाॅंटेड आहे.दरम्यान गून्हेशाखेचे पोलिसउपनिरीक्षक दत्ता शेळके यांना तारासिंगनेच जाधववाडी परिसरात मंगळसूत्र चोरल्याची माहिती मिळाली.खबर्‍याच्या मदतीने घाणेगावातून पीएसआय शेळके व हर्सूल पोलिस ठाण्याचे रफिक शेख यांनी पथकासह घाणेगावातून तारासिंग निमरोट ला ताब्यात घेतले. तर पोलिसांना दिलेल्या जबाबात तारासिंग ने सांगितले की, घटना घडली त्या दिवशी तो सकाळी ८ते रात्री ८ कामावर होता. पोलिस त्याच्या जबाबाची खात्री करत आहेत. वरील कारवाई पोलिसउपायुक्त अपर्णा गिते, दिपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव,अमोल देवकर, पीएसआय दत्ता शेळके रफिक शेख यांनी पार पाडली.

आपलं सरकार