Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे सर्वर डाऊन !!

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या अर्धा तासापासून  फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे सर्वर जगभरात डाउन झाले असल्याचे वृत्त आहे. भारतात रात्री ९ वाजेपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली आहे. युजर्सनी मोबाइल ॅपवरूनही प्रयत्न केला. पण कुठेही ते काम करत नसल्याने अनेक युजर्सनी एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान फेसबुकने लवकरच सेवा पूर्ववत होईल असे ट्विट करून युजर्सची दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुकच्या या ट्विटवर अक्षरशः हजारो प्रतिक्रया पडल्या आहेत.

दरम्यान फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे सर्वर डाऊन झाले असले तरी  ट्विटवर मात्र चालू असल्याने अनेक युजर्सनी आपल्या ट्विटचा पाऊस पडला आहे . फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्राम सेवा संपूर्ण जगभरात ठप्प आहे. सेवा ठप्प होण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्राम काम करत नसल्याचे  कळताच अनेकांनी ट्विटरवर याच्या कर्णाचा शोध घेतला त्यावर फेसबुकने एका ट्विटद्वारे खुलासा केला आहे. ट्विटरवर अनेकांनी फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्राम चालत नसल्याचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्रामची सेवा ठप्प  असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

फेसबुकचा खुलासा

दरम्यान, काही मिनिटांपूर्वी फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून युजर्सना माहिती दिली आहे. अनेक युजर्सना अॅप आणि तर प्रोडक्ट्स वापरण्यात अडचणी येत आहेत. पण लवकरच सेवा सुरू होईल. तसेच युजर्सना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिर आहोत. लवकरच सेवा सामान्य होईल, असे फेसबुकने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!