Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरण : संतप्त विरोधकांना योगी सरकारने जागेवरच थांबवले !!

Spread the love

कोलकाता : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या हिंसाचारात एका पत्रकारांसह ९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे लखीमपूरकडे निघालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना रोखण्यात राज्य सरकारला यश मिळाले असले तरी त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. देशभरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेवरून यूपीतील योगी सरकारसह सत्ताधारी भाजपला पक्षाने धारेवर धरले आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर तीव्र शब्दात टीका केली आहे.

भाजपवर टीका करताना ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे कि , उत्तर प्रदेशात ‘राम राज्य’ असल्याचा दावा भाजपा करते. पण तिथे ‘राम राज्य’ नाही, ‘किलिंग राज्य’ आहे. लोक मारले जात आहेत आणि सरकार जमावबंदी लागू करीत आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांची हत्या केली असून आम्ही त्याचा निषेध करतो.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यापूर्वी लखीमपूर खिरीच्या तिकोनिया भागात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला. यात चार शेतकऱ्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून यात एका पत्रकराचाही समावेश आहे. या प्रकरणात एकीकडे योगी सरकारने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलन करणाऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी अजय मिश्रा यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर दुसरीकडे या  प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेतील मृत ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचेही आश्वासन दिले आहे.

लखिमपुरात विरोधी नेत्यांच्या प्रवेशाला बंदी

लखीमपूर खिरीमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना मध्येच थांबवून पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कृतीविरुद्ध त्यांनी आपला आवाज उठविण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना लखीमपूर खिरीमध्ये जाऊ दिले नाही. दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांना त्यांच्या घराबाहेरच पोलिसांनी रोखले तेंव्हा संतप्त जमावाने पोलीस व्हॅनला पेटवून दिले परंतु आपल्या पक्षाला बदनाम करण्यासाठी हे करतंय केल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.

दरम्यान आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांना सीतापुर जिल्ह्यातील लाहारपूर येथे थांबवण्यात आले. सतीशचंद्र मिश्रा यांनाही गृहकैदेत ठेवण्यात आले. भीमर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनाही खैराबाद टोलनाक्यावर रोखण्यात आले. काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल रायपूरहून निघाले खरे परंतु त्यांना लखनौवरूनच परत फिरावे लागले. हरियाणावरुन दीपेंद्र हुड्डा यांनाही सीतापूरमध्येच अटक करण्यात आली. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या विमानाला लखनौच्या विमानतळावर उतरूच दिले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!