Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात , सख्ख्या भाऊ-बहिणीसह चार जण ठार

Spread the love

नागपूर : खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अमरावती मार्गावरील सातनवरील परिसरात भीषण अपघात झाला आहे. अनियंत्रित कारच्या धडकेत सख्ख्या भाऊ-बहिणीसह चार जण ठार झाले असून एक महिला जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. बंडू ऊर्फ गौतम जागो सालवणकर (वय ५५), चिन्नू विनोद सोनबरसे (वय १३ दोन्ही रा.सातनवरी), शिराली सुबोध डोंगरे (वय ६) आणि शौर्य सुबोध डोंगरे (वय ९ दोन्ही रा. इसापूर, ता.मौदा), अशी मृतकांची तर ललिता बाबूलाल सोनबरसे (वय ५० रा.सातनवरी) असे जखमीचे नाव आहे.

या अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास बंडू, चिन्नू, शिराली, शौर्य व ललिता हे पाच जण सातनवरी बस थांब्यावर बसची वाट बघत होते. याचवेळी अमरावतीहून नागपूरला जाणारी कार भरधाव वेगाने येत होती. तेव्हा वाटेत खड्डा असल्याने कार चालकाने तो वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित कार रस्तादुभाजकावर आदळली. त्यानंतर कारने पाचही जणांना धडक दिली व उलटली.

सदर अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाचही जखमींना नागपुरातील हॉस्पिटलकडे रवाना केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!