Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर भागात हिंसाचार, तीन वाहने पेटवली , ८ ठार

Spread the love

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर भागात  कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कार गेल्याने, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी आंदोलन करण्यासाठी जात होते. ही घटना घडल्याने गोंधळ उडाला आणि घटनास्थळी उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी तीन वाहने पेटवून दिली. या सर्व घटनांमुळे  खीरीच्या तिकुनिया भागात मोठा हिंसाचार उफळला असून, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू  झाला असल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या आठ जणांमध्ये चार आंदोलक शेतकरी आणि चारजण एका प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरामधील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियोजित दौरे रद्द केले आहेत

या सर्व प्रकरणात शेतकऱ्यांचा आरोप आहे की विरोध करणाऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने कार चढवली. ज्यामुळे अनेक शेतकरी जखमी देखील झाले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. तर, संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या मारहणाीत वाहन चालकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि योगी सरकार यांच्यावर तीव्र टीका केली असून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या लखीमपूर येथे जाणार आहेत.

लाखिमपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य या भागाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी  स्वतः या हिंसाचार ८ जण ठार झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या सर्व घटना दुर्दैवी असून या घटनांची  चौकशी करण्यात येईल तसेच दोषींची गय केली जाणार नाही , असे आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी म्हटले आहे कि , शेतकऱ्यांच्या अपघातातील एक कार त्यांच्या मुलाची अली तरी त्यांचा मुलगा त्यात नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर कर घटल्याच्या रोपाचा इंकार केला आहे.

लाखिमपुरात नेमकं काय घडलं ?

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार , केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी तेनी गावात बनवीरमध्ये उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री  केशव प्रसाद यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावाच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. यावेळी, शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले. तर याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तीव्र निषेध

दरम्यान या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. काँग्रेस पाठोपाठ आता अन्य विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर या घटनेवरून जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी या घटेनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवताना म्हटले आहे कि , “आमच्या शेतकऱ्यांचा आवज दाबण्याची हि क्रूर पद्धत असून मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो.

दुसरीकडे भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, या हिंसाचारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी राकेश टिकैत यांनी म्हटले आहे  की, शेतकरी परतत असताना वाहनांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे. तर, काँग्रेसने देखील भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपा शेतकरी चळवळीला, आंदोलनाला थांबवू शकला नाही. म्हणूनच, त्यांनी शेतकऱ्यांसोबत  हे कृत्य करण्यात आले. आज या हत्याकांडावर जो कोणी गप्प राहिला आहे त्याने विसरू नये की कालचक्र एक दिवस त्यांनाही लक्ष्य करेल. ही परिस्थितीला सर्वस्वी नरेंद्र मोदींचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी जबाबदार आहेत”, अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केली. श्रीनिवास यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.

प्रियांका आणि राहुल गांधी यांची टीका

या घटनेचा निषेध करताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि , हा नरसंहार पाहून जो कोणी गप्प आहे, समजून घ्या तो आधीच मेला आहे. पण आम्ही शेतकऱ्यांचे हे बलिदान व्यर्त जाऊ देणार नाही. किसान सत्याग्रह जिंदाबाद !. तर प्रियांका गांधी यांनी , भाजप देशातील शेतकऱ्यांचा किती द्वेष करते? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांनी आवाज उठवला, तर तुम्ही त्यांना गोळ्या घालणार का, तुम्ही गाडीखाली तुडवाल का? हे खूप झाले . हा शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपच्या क्रूर विचारसरणीची जहागिरी नाही. शेतकऱ्यांचा सत्याग्रह आणखी बळकट होईल आणि शेतकऱ्याचा आवाज आणखी मोठा होईल,  असे आपल्या  ट्विटमध्ये म्हटले  आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!