Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिवसभरात राज्यात २ हजार ०२६ रुग्णांची नोंद तर बरे झालेल्याची संख्या ५ हजार ३८९

Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ०२६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली असून काल ही संख्या २ हजार ६९२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ५ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ७१६ इतकी होती. तर, आज २६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४१ इतकी होती.

आज राज्यात झालेल्या २६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८६ हजार ०५९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३१ टक्के इतके झाले आहे.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत कमालीची घट

सध्या राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ६३७ इतकी आहे. काल ही संख्या ३५ हजार ८८८ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ८३९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ८४८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार १६२ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ९०६ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ११६ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९९२ आहे.

आजघडीला मुंबईत ६,१९८ रुग्ण उपचार घेत असून यापैकी मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १९८ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६०० इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७११, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४७ इतकी खाली आली आहे. दरम्यान गोंदियात १ सक्रिय रुग्ण असून औरंगाबादमध्ये ४७८ तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९९ इतकी असून अमरावतीत ही संख्या १०७ वर आली आहे. तर गोंदियात राज्यात सर्वात कमी १ सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९३ लाख ३७ हजार ७१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६२ हजार ५१४ (११.०६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४० हजार ०८८ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ३५५ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!