AurangabadNewsUpdate : औरंगाबाद भाजपतर्फे गांधी जयंतीदिनी तिरंगा पदयात्रा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद भाजपच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती,  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने साजऱ्या करण्यात येणाऱ्या  सेवा समर्पण पंढरवाड्यानिमित्ताने  भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात शहरात पैठण गेट येथील लोकमान्य टिळक व गोविंद भाई श्राफ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा यात्रा पद काढण्यात आली. 

Advertisements

या निमित्ताने पुष्पहाराने सजवलेल्या एका वाहनावर भारत मातेचा फोटो ठेवून देशभक्तीपर गीते वाजवत, ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी मध्ये हि तिरंगा पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.  सिटी चौक येथील क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप करण्यात आला.  या वेळी देशभक्तीपर गीते वाजवून भारत माता की, जय वंदे मातरम,भारतीय जनता पार्टीचा ,विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

Advertisements
Advertisements

या तिरंगा पदयात्रेचे शहरातील नियोजन सरचिटणीस समीर राजूरकर ,जगदीश सिद्ध, राज वानखेडे, यांनी केले, यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे , प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, शहराध्यक्ष संजय केनेकर, बापू घडामोडे ,राजु शिंदे,राजेश मेहता,शिवाजी दांडगे,आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी बोलताना संजय केणेकर म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार खऱ्या अर्थाने देशात, जगात, शांततेचा,व ग्रामीण भागाच्या विकासाचा स्वच्छतेचा संदेश देणार आहे, आज आपण सर्व महात्मा गांधींच्या विचाराने देशामध्ये मार्गक्रमण करत आहोत. या नंतर भाजप प्रदेश सरचिटणिस आ.अतुल सावे म्हणाले कि ,  महात्मा गांधीच्या स्वप्नातील भारत खऱ्या अर्थाने उभारण्याचे कार्य आज भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत. त्यांना अपेक्षित असणारा भारत घडवण्यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी, सतत प्रयत्न करत असतात. यावेळी भाजप प्रदेश चिटणीस प्रविण यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी जालिंदर शेंडगे,डॉ.उजवला दहिफळे, अनिल मक्रिये, सविताताई कुलकर्णी, माधुरीताई अदवन्त,प्रा.डॉ.राम बुधवंत, अमृताताई पालोदकर, राजेंद्र साबळे पाटील, प्रमोद राठोड, दयाराम बसय्ये,  महेश माळवतकर, प्रा.गोंविद केंद्रे, साधना सुरडकर,  मनीषा मुंडे,राहुल नरोटे, मयुर वंजारी,  बबन नरवडे,  हफीज शेख,  दौलतखान पठाण,  सागर पाले,  प्रवीण कुलकर्णी,  सिद्धार्थ साळवे,  दीपक बनकर,  अजय शिंदे,  लक्ष्मीकांत थेटे,  अरुण पालवे, शंकर म्हात्रे,अशोक दामले, संजय खनाळे,  अरविंद डोंनगावकर, राजू पाटील, ललित माळी, राजेश मिरकर,  अप्पा हिवाळे, आनंद वाघ, महेश राऊत,  दीपक खोतकर,  पंकज साखला , शाकेर राजा,  बंटी चावरीया, सुनील सोनवणे,  बंटी हेकाडे, लक्ष्मीकांत काथार, साहेबराव निकम,  निलेश धारकर, रूपाली वाहुळे, धनंजय पालोदकर,  निरज जैन, पंकज वैष्णव,  सलीम सय्यद,  सलीम शेख,  सुनील तुपे,  अनिल वाणी,  संतोश शिंदे,  महेश मलेकर, गीता कापुरे,  दिव्या पाटील,  गीता कापुरे,  रूपाली वाहूळे, मीना मिसाळ,  सुवर्णा तुपे,  अनिता खडके,  वंदना शहा, सरिता घोडतुरे, छाया खाजेकर,  जयश्री दाभाडे आदी सह प्रदेश पदाधिकारी सह सर्व प्रकोष्ठ आघाड्या चे पदाधिकारी उपस्थित होते.

आपलं सरकार