WorldNewsUpdate : इक्वेडोरमधील ग्वायकिल शहरातील तुरुंगात कैद्यांच्या दंगलीत ११६ ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

क्योटो :  इक्वेडोरमधील ग्वायकिल शहरातील एका तुरुंगात ‘लॉस लोबोस’ आणि ‘लॉस चोनेरोस’ या  कैद्यांच्या दोन गटांत दंगल उसळली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आणि लष्करी जवानांना काही तास लागले. तुरुंगातील या हिंसक संघर्षात बॉम्ब फेकण्यात आले. त्याशिवाय गोळीबार, चाकू हल्ला ही करण्यात आला. सध्या संपूर्ण तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था लष्कराने ताब्यात घेतली आहे. तुरुंगातील दंगलीत ११६ जण ठार झाल्याचे वृत्त असून या कैद्याच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी या दंगलीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

Advertisements

या दंगलीबाबत तुरुंग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहिल्यांदा या कैद्यांमध्ये वाद सुरु झाला. ज्यात त्यांनी परस्परांवर विस्फोटक फेकली. या भीषण दंगलीत छिन्न -विछिन्न झालेल्या मृतदेहांची ओळख पटविणे तुरुंग प्रशासनाला कठीण झाले आहे. अद्यापही तुरुंगातील पूर्ण माहिती प्राप्त झालेली नाही. दरम्यान तुरुंग अधिकाऱ्यांनी आता तुरुंगात शांतता असल्याचे सांगितले असले तरी तुरुंगाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पुन्हा विस्फोटकांचे आवाज ऐकल्याचे सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

इक्वेडोरचे तुरुंग अधीक्षक बोलिवर गारज़ोन यांनी सांगितले कि ,  हि दंगल आटोक्यात आणण्यासाठी ४०० अधिकाऱयांना तीनात करण्यात आले आहे. ‘लॉस लोबोस’ आणि ‘लॉस चोनेरोस’ या दोन टोळ्यांच्या कैद्यांमध्ये ही दंगल झाली. या वेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. चाकूने हल्ले करण्यात आले. एक स्फोटही झाला. या दंगलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दंगलीत आतापर्यंत ११६ ठार झाले असून ५२ जण जखमी झाले आहेत. दंगल झालेल्या दोन्ही टोळ्या या अमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित आहेत. या दंगलीत काही जणांचे शीर धडावेगळे करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर, दोन पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. तुरुंगातील या हिंसाचारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तुरुंगातील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पाच तास लागले असल्याची माहिती देण्यात आली.

या आधीही फेब्रुवारीमध्ये चार तुरुंगातील दंगलीत ७९ कैदी ठार झले होते. इक्वाडोरच्या शेजारी असलेल्या  पेरू आणि कोलंबिया येथील ड्रग माफियांचाही यात मोठं सहभाग आहे.  या तुरुंगांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हे प्रकार घडतात असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. हि घटना लक्षात घेऊन  इक्वाडोरचे  राष्ट्रपति गुइलेर्मो लासो यांनी तुरुंग क्षेत्रात आपत्कालीन स्थितीची घोषणा केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात आली असून कैद्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत पुरवली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार