ThaneiNewsUpdate : तालिबान्यांशी संघाची थेट तुलना केल्याबद्दल जावेद अख्तर यांना कारणे दाखवा नोटीस

Advertisements
Advertisements
Spread the love

ठाणे : तालिबान्यांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तुलना करून त्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून ठाणे न्यायालयाने लेखक, गीतकार जावेद अख्तर यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तालिबान आणि ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे त्यांच्यात विलक्षण साम्य असल्याची टिप्पणी जावेद यांनी एका मीडिया संवादामध्ये काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर ठाणे न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.

Advertisements

दरम्यान आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. सामान्य लोकांच्या नजरेत आरएसएसची बदनामी केल्याबद्दल त्यांनी एक रुपयांची भरपाई मागितली आहे. जावेद अख्तर यांच्या या संवादानंतर शिवसेनेनेही आरएसएस आणि तालिबानची तुलना करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.

Advertisements
Advertisements

या याचिकेमध्ये आरएसएसला बदनाम करण्यासाठी आणि आरएसएसमध्ये सामील झालेल्या लोकांना निराश करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी तसेच त्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे विधान सुनियोजितपणे केल्याचा दावा चंपानेरकर यांनी केला आहे.

आपलं सरकार