Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : खा. सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि पावसावरून दिला कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र

Spread the love

पुणे : ‘निवडणूक आल्या आहेत. जे कुणी इच्छुक असतील , त्यांना सांगू इच्छिते की, राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, दोन गोष्टी होतात एक तर ईडीची नोटीस आली असेल किंवा पाऊस पडला असेल तर आपली सीट शंभर टक्के निवडून येते’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच, ‘आता तिकीट कुणाला मिळेल मला माहिती नाही. पण इथे जे जे इच्छुक उमेदवार असतील आणि ते पाऊसामध्ये भिजले असेल तर ‘समजो पप्पू पास हो गया है’, नक्कीच आपल्याला आगामी काळात या भागातून गोड बातमी मिळेल’ असा विश्वासही यावेळी सुळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना म्हटले कि , महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि आमदारांना ईडीच्या नोटीसाच नोटीसा मिळत आहे. अनेक मंत्र्यांच्या ईडीच्या कार्यालयात चक्करा सुरू आहे. तर, आगामी निवडणुकामध्ये जर कुणी इच्छूक असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला जर ईडीची नोटीस आणि पाऊस पडला तर शंभर टक्के सीट आपली आलीच समजा. पुण्यातील बावधन परिसरात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी हि राजकीय टोलेबाजी केली. कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला.

केंद्र सरकार विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना बाबत बोलताना सुळे म्हणाल्या कि , गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पण केंद्र सरकार यात चर्चा ही करायला तयार नाही, हे केंद्र सरकार म्हणजे दडपशाहीचे सरकार आहे, अशी टीका सुळे यांनी केली. ज्याला जे बोलायचे त्याला ते अधिकार आहे, त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये. आता सिलेंडर आणि पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत, ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण केंद्र सरकारच्या विरोधात काही बोलले की कारवाई होते, हे दडपशाहीचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!