IndiaNewsUpdate : शेतकऱ्यांच्या भारत बंदबद्दल राकेश टिकैत यांनी व्यक्त केल्या “या” भावना…

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेला आजचा भारत बंद पूर्णपणे यशस्वी झाला असल्याचा दावा करीत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार मानले आहेत . दरम्यान या भारत बंद दरम्यान स्वाभाविकपणे नागरिकांना त्रास झाला असेल. पण एक दिवस शेतकऱ्यांच्या नावे, असे समजून त्यांनी विसरून जावे असे आवाहन जनतेला केले आहे.

Advertisements

राकेश टिकैत यांनी म्हटले आहे कि , शेतकरी आपली घरे सोडून १० महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. पण आंधळे आणि बहिऱ्या सरकारला काहीही दिसत नाही किंवा ऐकायला येत नाही. लोकशाहीत निषेध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकरी रिकाम्या हाताने घरी परततील, या भ्रमात त्यांनी राहू नये. आजूनही शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे.

Advertisements
Advertisements

दरम्यान आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला,असा दावा करीत राकेश टिकैतन यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठेही हिंसक झडप झाली नाही. यासाठी देशातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांचेही आभार मानले. हे तीन राज्यांचे आंदोलन असल्याचे म्हणणाऱ्यांनी डोळे उघडून पाहावे, पूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. उत्तर प्रदेशात वाढवलेले ऊसाचे दर हे शेतकऱ्यांची चेष्टा करणारे आहेत. त्याविरोधातही लवकरच रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा टिकैत यांनी दिली.

आपलं सरकार