Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आगामी निवडणुकीत औरंगाबादमध्ये भाजपचा महापौर करण्याचा निर्धार

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील जनमत हे भाजपच्या बाजूने आहे, हे आता सर्वश्रुत आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक जिंकण्यासाठी  सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कामाला लागून, औरंगाबाद  महानगरपालिकेत आपला महापौर हा विराजमान झाला पाहिजे असा निर्धार भाजपचे  शहराध्यक्ष संजय केनेकर व प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केला आहे . भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून  देशांमध्ये, राज्यांमध्ये, विकास करण्यासाठी, भाजपचे  कार्यकर्ते , नेते अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यामुळे आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी महानगरपालिका लढवणार आहोत, सर्व प्रभागा मध्ये आपण नगरसेवक उभे करून स्वबळावर निवडणुक लढवणार आहोत. त्यासाठी  कार्यकर्त्यांनी बुथ स्तरावर संर्पक ठेऊन, घरोघरी जनसंपर्क वाढवूनजनतेला जागरूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या पार्श्वभूमीवर कुलस्वामिनी मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजय केणेकर म्हणाले कि , शहराचे अनेक वर्षापासून न सुटलेले प्रश्न हे ज्यांनी शहराला १४ महापौर दिलेत त्यांच्यामुळे निर्माण झाले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपहार करून जनतेच्या पैशावर लुटमार करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे आज शहरांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, शहराला जो काही विकास निधी आला तो भारतीय जनता पार्टी चे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्याच  काळात आला त्यामुळे ,शहरा मधील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, स्मार्ट सिटी ची बस व्यवस्था, ही उभी राहिली आहे, कचरा समस्या देखील भाजप सरकारच्या काळात आलेल्या निधीमुळे सुटलेली आहे.

यावेळी बोलताना आ, अतुल सावे म्हणाले कि , आजच्या घडीला औरंगाबाद महानगरपालिकेला, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही मदत केली नाही, व शहराच्या विकासाची त्यांना कुठलीही जाण नाही . शहराची जी काही वाताहत झाली आहे ती त्यांच्यामुळे झाली आहे. त्या साठी जनतेमध्ये जाऊन या ढोंगी महाविकास आघाडीचा बुरखा फाडावा व जनतेला फसवणाऱ्या या राजकारण्यांना उघडे पाडावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले .

या आढावा बैठकीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी ,जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष ,बुथ अध्यक्ष, व सर्व आघाड्यांचे अध्यक्ष ,व पदाधिकारी उपस्थित होते, या वेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, जिल्हा सरचिटणीस समीर राजूरकर ,शिवाजी दांडगे ,राजेश मेहता ,राजू शिंदे आदी उपस्थित होते महिला मोर्चा अध्यक्ष अमृता पालोदकर,अनिल मकरिये,संजय जोशी,शिरीष बोराळकर,जांलिदंर शेंडगे,प्रमोद राठोड,दिलीप थोरात,माधुरी आदवंत,मंडल अध्यक्ष आरूण पालवे रवि एडके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!