MaharashtraRainUpdate : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या  राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असून  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, िहगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्य़ांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Advertisements

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात वायव्य भागामध्ये ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ तीव्र होऊन ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्र प्रदेशच्या किलगामपट्टनम दरम्यान रविवारी धडकले. दरम्यान या चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीच्या भागात मोठा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चक्रीवादळाचा फटका थेट विदर्भापर्यंत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भापासून कोकणपर्यंत सर्वच भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

कोकण विभाग : ठाणे, पालघर, रायगड , मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  उत्तर महाराष्ट्र :  जळगाव, धुळे, नंदुरबार,  नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ,मराठवाडा :  औरंगाबाद, जालना, परभणी, िहगोली, नांदेड , विदर्भ :  चंद्रपूर , यवतमाळ, गडचिरोली या भागाला सावधानतेचा इशारा  देण्यात आला आहे.

आपलं सरकार