Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला ” हा ” निर्णय

Spread the love

मुंबई : अखेर भाजपने राजीव सातव यांच्या निधनानंतर होणाऱ्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठीच्या  पोटनिवडणुकीतून आपले उमेदवार संजय उपाध्याय यांचा अर्ज माघे घेण्याचा निर्णय घेतल्याने आता हि निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  दरम्यान  महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चार  दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपने घेतलेल्या निर्णयानुसार आज दुपारी ते विधीमंडळात जाऊन संजय उपाध्याय आपला अर्ज माघारी घेतील असे सांगण्यात येत आहे. रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटले  होते  की, “आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”. दरम्यान, भाजपाने परंपरा कायम राखल्याने आता  ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!