Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalNewsUpdate : रामदास आठवले यांनी उपस्थित केला पुन्हा सोनिया गांधी यांचा विदेशी वंशाचा मुद्दा

Spread the love

इंदूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गाजला होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा मुद्दा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनू शकतात तर मग इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का होऊ शकत नाही? असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवे होते. पण सोनियांना पंतप्रधान व्हायचे नव्हते तर मग त्यांनी काँग्रेसला बळकट करण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान करायला हवे होते.

आठवले म्हणाले कि , भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात तर मग भारताचे नागरिक आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि लोकसभेच्या खासदार सोनिया गांधी या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असे रामदास आठवले म्हणाले.शरद पवार हे लोकनेते आहेत. पंतप्रधानपदासाठी त्यांच्यात पात्रता होती. पण काँग्रेसने मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले, शरद पवारांना केले नाही. शरद पवार २००४ मध्ये पंतप्रधान झाले असते तर काँग्रेस मागे पडली नसती. आज काँग्रेसची तीच स्थिती आहे, असं ते म्हणाले.

यूपीएला २००४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बहुमत मिळाले होते. सोनिया गांधींना पंतप्रधान करावे , असा प्रस्ताव आपण तेव्हा मांडला होता. तसेच सोनियांचा विदेशी वंशाच्या मुद्दा निरर्थक आहे, असे आपण म्हटल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. सोनिया गांधींच्या विदेश वंशाच्या मुद्द्यावरून शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!