IndiaNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत , गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होत आहे बैठक

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावली असून याबैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात नक्षलवाद्यांच्या मुद्द्यावर ही बैठक होत आहे. या बैठीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विज्ञान भवन येथे पोहोचले आहेत.

Advertisements

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या बैठकीला उपस्थित झाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे ८ जूनला पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी त्यावेळी भेट घेतली होती. त्यांच्यासोबत त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार