Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NashikNewsUpdate : ट्रक आणि ॲपेरिक्षाच्या भीषण अपघातात पाच ठार , लोणी प्रवरा येथील दोघांचा समावेश

Spread the love

नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि ॲपेरिक्षा यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले असल्याचे वृत्त आहे. शनिवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव – विंचूर रस्त्यावर हा अपघात झाला. मृतांमध्ये लोणी प्रवरा (अहमदनगर) येथील दोघांचा समावेश आहे. या अपघातातील जखमींना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु यातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , शनिवारी सायंकाळी ॲपेरिक्षा प्रवाशांना घेऊन निघाली होती. यावेळी समोरून आलेल्या ट्रकशी तिची धडक झाली. या अपघातात सुहास निकाळे (४०, रिक्षाचालक, विंचूर), विठ्ठल भापकर (६५) आणि भाऊसाहेब नागरे (६०, दोघेही लोणी-प्रवरा), किसन बैरागी (६०, धारणगाव खडक), रतन गांगुर्डे (४०, इंदिरानगर, विंचूर) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!