Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Unlock Maharashtra | २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू

Spread the love

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. २२ ऑक्टोबरला राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होतील. जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल. देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृह सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर आज याबद्दलचा निर्णय झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!