Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : त्यांचा काळ आला होता पण वेळ अली नव्हती !!

Spread the love

जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्ठी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कसुरा नदीवरील पुलावरील पाण्यामुळे एसटी बस पुराच्या पाण्यात आडवी झाली. परंतु जवळच असलेल्या गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केल्यामुळे बसमधील सर्व २३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यामुळे या बसमधील प्रवाशांचा काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.

या अपघाताची अधिक माहिती अशी कि , शेगाव-पंढरपूर या दिंडी महामार्गावरील परतूर आष्टी धोतरजोडा या दरम्यान कसुरा नदीवरील पुलावरून गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पुराचे पाणी वाहत आहे. तरीही पुलावरून वाहतूक सुरू आहे. दरम्यान परतूर आगाराची बस क्रमांक एमएच २० बीएल २२८० ही बस या पुलावरून श्रीष्ठी गावाच्या दिशेने जात असताना पुलावरील एका खड्ड्यात बसचे पुढचे चाक अडकले आणि त्यानंतर बस एका बाजूला आडवी झाली. या वेळी पुलावरून साधारणपणे दोन ते तीन फूट पाण्याचा प्रवाह वाहत होता. प्रवाशांचा आक्रोश ऐकून पुलाच्या जवळ असणारे गावकरी तात्काळ प्रवाशांच्या मदतीसाठी धावले आणि प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यास मदत केली.

या अपघाताचे वृत्त समजताच एसटी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद मेहूल, उपविभागीय महसूल अधिकारी जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, सरपंच प्रदीप अंभोरे यांनी तातडीने जाऊन मदत कार्य केले. रात्री साडेनऊ वाजता बस पाण्यातून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!