Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DeathNewsUpdate : काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन

Spread the love

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. रणपिसे यांच्या काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार ते पाच दिवस शरद रणपिसे यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. दरम्यान, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार शरद रणपिसे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केली. त्यानंतर त्यांनी थेट विधान परिषद गाठली. पुढे त्यांचा प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले. रणपिसे हे १९७९-८५ या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर १९८३-८४ ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर १९९४-९५ मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, पुणे चे सदस्य होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!