CoronaMaharashtraUpdate : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के , ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दिवसभरात ४ हजार ०५० जण कोरोनामुक्त झाले. काल ही संख्या ४ हजार २८५ इतकी होती. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ५३ हजार ०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ३ हजार ३२० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काल ही संख्या ३ हजार ६०८ इतकी होती.  तर ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३९ हजार १९१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३४ हजार ५५७ झाली आहे.

Advertisements

दरम्यान  राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ, आणि एकूण सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याने राज्याला थोडा दिलासाही मिळाला आहे.

Advertisements
Advertisements

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजार १९१ इतकी आहे. काल ही संख्या ३९ हजार ९८४ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र पुण्यातील ही रुग्णसंख्या आज घटल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ८०७ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ५ हजार ८३३ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ६०४ वर आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार २३२ अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ६४८ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ९१९ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ५६२ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६५६ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७०३, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९३८ इतकी आहे.

आजघडीला धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३४, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १३३ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९२ वर आली आहे. तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच १ सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७६ लाख ४६ हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३४ हजार ५५७ (११.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ८४२ व्यक्ती गृहविलगीकरणात  आहेत. तर, १ हजार ४६१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आपलं सरकार