AurangabadCrimeUpdate : गुन्हे शाखेकडून आंतरराज्य गुन्हेगार गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात  शहरासह चेनस्नॅचिंग करणार्‍या चोरट्यावर पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशावरुन गुन्हे शाखेने एमपीडीए ची कारवाई करत त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. जावेद उर्फ लंगअली पिता गरु अली इराणी (३०) रा.पापानगर रजा टाॅवर भुसावळ असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Advertisements

शहरातील उस्मानपुरा, सातारा आणि जवाहरनगर.तसेच शिरपूर, परभणी, धुळे या ठिकाणी पोलिस ठाण्यात जावेदवर जबरी चोरी, ठकवणे, बनावटीकरणाचे गुन्हे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर ही जावेद चे गुन्हे थांबत नव्हते. वरील कारवाई पोलिसउपायुक्त अपर्णा गिते, दिपक गिर्‍हे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, संतोष पाटील,एएसआय द्वारकादास भांगे, पीएसआय अजित दगडखैर,पोलिस कर्मचारी नाना हिवाळे, आशा केंद्रे, दिपाली सोनवणे यांनी पार पाडली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार