Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पशूपती मॅडोस वफिनामेनल हेल्थ केअर सर्विसेस प्रकरण, अध्यक्ष केसरसिंग औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

औरंगाबाद – पशुपती मॅडोस गृहप्रकल्प व हेल्थ केअर पाॅलिसीच्या पैशातून अवैधरित्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे खरेदी केलेला ३० एकर भूखंड आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्यानंतर सहा महिन्यांनी आरोपी असलेल्या अध्यक्षाला लातूर पोलिसांकडून वर्ग करुन शहरात आणले. नंदलाल केसरसिंग असे या आरोपीचे नाव आहे.लातूर शहरातील नागरिकांची अंदाजे २०कोटी रुपयांची फसवणूक केसरसिंगने केलेल्या प्रकरणात लातूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या .तसेच शहरातही काही नागरिकांची ७ ते ८कोटी रुपयांची फसवणूक त्याने पशुपती मॅडोस प्रकल्पासाठी केलेली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधे बहुतेक सर्वच सिनेतारकांचे प्रत्येकी ५ते १०एकर चे फार्म हाऊसेस आहेत.त्याच परिसरात नंदलाल ने पशुपती मॅडोससाठी ३०एकर जमीन खरेदी केली होती.आर्थिक गुन्हेशाखेचे तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी महेश उगले यांनी मुरबाड येथील नंदलाल केसरसिंग ची जमीन एमपीडाआय(महाराष्र्ट ठेवीदारांच्या गुंतवणूक सुरक्षा कायदा)अॅक्ट नुसार जप्त केली होती.

दरम्यान शहरात नंदलाल केसरसिंग ने फिनामेनल हेल्थ केअर नावाचा बोगस प्रोजेक्ट सुरु केला.केसरसिंग ने फिनामेनल हेल्थकेअर च्यानावाखाली ३१लाख रुपयांना नागरिकांना गंडवले.व ज्योतीनगर व मुंबईतील हेल्थकेअर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाला होता.या प्रकरणी आरोपी नंदलाल केसरसिंग सोबंत, थक्केमधातील श्रीधरन,सेबेस्टिन मल्लीकल,मीनबहाद्दूर केसर सिंग, विलास नायर, जोसेफ लाझर सर्व रा.मुंबई यांच्या विरुध्द २०१८साली उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.वरील प्रकरणाचा तपास सुरु असतांना लातूर पोलिसांकडील केसरसिंग ची शिक्षेची मुदत संपत असल्याची माहिती शहर पोलिसांना कळाली.म्हणून २१सप्टेबर २१रोजी केसरसिंगला शहर पोलिसांनी वर्ग करुन आणले. वरील कारवाई पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे एपीआय तृप्ती तोटावार पोलिस कर्मचारी गोकुळ वाघ, वाठ्ठल मानकापे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!