Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : सोमय्या – हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचीही एंट्री

Spread the love

गोवा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर थेट आरोप करीत राज्यातील वातावरण चांगलेच ढवळले आहे.  पत्रकार परिषद आणि प्रति पत्रकार परिषदेच्या लढाईत विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या गोवा दौऱ्यात पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आरोपांना उत्तरे देऊन या वादात एंट्री केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.

मुश्रीफ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आपणास  भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा केला होता.  त्यावर उफडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि,कोणी दिली मुश्रीफांना ऑफर? आम्ही असे ऑफर घेऊन थोडेच फिरत असतो . आमचे ऑफर लेटर काही  मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले  असेल कि , जो एखादा व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसात निघाला असताना पोलीस त्याला अडवितात, त्याला घरात कोंडून ठेवतात. हे तर ठोकशाहीचच सरकार आहे. स्वतंत्र भारतात अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था पाहायला मिळाली नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. हे खूपच भयानक असून आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत.

फडणवीस पुढे म्हणाले की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितले  जातं की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे. पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल, असं सांगायला ही फडणवीस विसरले नाही.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!