Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : धक्कादायक : आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

Spread the love

प्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील गेस्ट हाऊसमध्ये आढळला. मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली. यात एका शिष्यामुळे दुःखी असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या चिठ्ठीत त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने आनंद गिरी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. पण पोलिसांनी या प्रकरणी कुठलीहि माहिती देण्यास नकार दिला आहे. ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, नरेंद्र गिरी महाराजांच्या मृत्यूचे वृत्त समजटाच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटद्वारे केलेल्या शोक संदेशात म्हटले आहे कि , हि अतिशय दुःखद घटना आहे. त्यांनी आध्यात्मिक परंपरा जपली. संत समाजाला एकजूट करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांना प्रभू चरणी स्थान मिळू दे.

पोलीस महासंचालकांनी माहिती

याविषयी अधिक माहिती देताना प्रयागराजचे पोलीस महानिरीक्षक के. पी. सिंह म्हणाले कि , माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तेंव्हा आम्ही महाराजांना जमिनीवर पडलेले पाहिले , पंख्याला दोरी अडकली होती आणि महंत हे मृतावस्थेत दिसून आले. प्रथमदर्शनी ही आत्महत्याच असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून या चिठ्ठीत त्यांनी आश्रमाविषयी मृत्युपत्र लिहिले आहे. आपण आत्महत्या करत आहोत आणि एका शिष्यामुळे दु:खी आहोत, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

नरेंद्र गिरी यांचा मृत्यू सामान्य नाही : आनंद गिरी यांनी

दरम्यान महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या बातमीने एकाच खळबळ उडाली असून त्यांचे समर्थक आणि शिष्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. नरेंद्र गिरी यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी शिष्य आनंद गिरी यांच्याशी वाद झाले होते. मात्र गुरूंच्या मृत्यूमागे षड्यंत्र असल्याचा दावा शिष्य आनंद गिरी यांनी केला असून नरेंद्र गिरी यांचा मृत्यू सामान्य नाही, एक मोठा कट रचण्यात आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आनंद गिरी यांनी पुढे म्हटले आहे कि , ‘आता मी हरिद्वारमध्ये आहे. उद्या प्रयागराजला पोहोचल्यावर सत्य काय आहे ते पाहू. सर्वांना कामे करता यावीत म्हणून आम्ही वेगवेगळे झालो, असे आनंद गिरी म्हणाले. नरेंद्र गिरी यांच्याशी झालेल्या वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. माझा त्यांच्याशी नाही तर मठाच्या जमिनीवरून वाद होता. यात संशय असलेले अनेक जण आहेत. त्यांनीच आपल्याविरोधात नरेंद्र गिरी यांना चिथावल्याचा आरोपही आनंद गिरी यांनी केला आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!