AurangabadCrimeUpdate : व्वारे पट्ठ्या !! महिलांचा वेष परिधान करुन करायचा चोऱ्या , गुन्हे शाखेची कारवाई ,

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – शहरातील ५पोलिस ठाण्यात घरफोडी व इतर गंभीरगुन्हे असलेल्या गुन्हेगाराला गून्हेशाखेने अटक केली.व एका घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला आहे.महिलांचा वेष धारण करुन चोरी करण्यात हा चोरटा पारंगत असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे. नईम उर्फ चून्नु ऊस्मान शहा (३७)रा. सईदा काॅलनी जटवाडा रोड असे अटक आरोपीचे नाव आहे.

Advertisements

अंदाजे एक वर्षापूर्वी एन१सिडकोतील रहिवासी रविंद्रकुमार सेठी (५४) यांच्या घरी घरफोडी केल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल असून त्याच परिसरात राहणारे वकील खलील अहमद गुलाम(५५) यांच्या घरात गेल्या २९आॅगस्ट रोजी घरफोडी केली.या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गून्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हेशाखेने जप्त केला आहे.तर दोन आठवड्यांपूर्वी हर्सूल परिसरातील म्हसोबानगरात राहणार्‍या कडूबाई चाथे(४५) यांचे घरफोडल्याची कबुली अटक आरोपीने पोलिसांना दिली.चाथे प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Advertisements
Advertisements

शहरातील सिटीचौक, बेगमपुरा, मुकुंदवाडी,सिडको, सिडको औद्योगिक पोलिस ठाणे या पोलिस ठाण्यात आरोपी नईम विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरील कारवाई सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळोखे,पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके यांनी त्यांच्या पथकासह पार पाडली.त्यांच्या पथकात पोलिस कर्मचारी नंदकुमारभंडारे,किरण गावंडे, संजयसिंग राजपूत,ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड,कुंटे आणि पूनम पारधी यांचा समावेश होता.

आपलं सरकार