Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाची देशातील आजची स्थिती

Spread the love

नवी दिल्ली : देशात काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ६६२ कोरोनाबाधित आढळले असून ३३ हजार ७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २८१ जणांच्या मृत्यची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या ३ लाख ४० हजार ६३९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात नव्या बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० झाली आहे.

दरम्यान देशाचा रिकव्हरी रेट ९७.६५ टक्क्यांवर आहे. तसेच आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ बाधितांनी कोरोनातून बरे झाले आहेत. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४४ हजार ५२९ जणांना जीव गमवावा लागला आहे. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ८५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटिव्हीटी रेट २.४६ टक्क्यांवर असून हा दर १९ दिवसांपासून तीन टक्क्यांच्या खाली आहे. दरम्यान, देशभरात काल विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात अडीच कोटी लोकांना करोना लस देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!