Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अमित शहा  आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 

Spread the love

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशातील गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड या भाजपशासित राज्यात नेतृत्व बदल करण्यात आले आहेत. त्यातच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना मला माजी म्हणू नका असे वक्तव्य करून महाराष्ट्रातील राजकारण्यांसमोर मोठे कोडे टाकले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे उद्या महाराष्ट्रात येत आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या नांदेडमध्ये येणार आहेत. सीआरपीएफने आयोजित केलेल्या वृक्ष लागवड मोहीमेत अमित शहा सहभागी होणार आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे. महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणासह राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमधील नेत्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा येत आहे. यामुळे अमित शहा या दौऱ्यात राज्यातील भाजप नेत्यांना भेटणार का? तसंच अमित शहा काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

दरम्यान अमित शहा हे उद्या नांदेडसह तेलंगणातील निर्मल जिल्ह्याचाही दौरा करणार आहेत. ‘तेलंगण मुक्ती दिना’निमित्त भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. तेलंगण मुक्ती दिन म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसंच अमित शहा हे यावेळी रक्तदान शिबिराचंही उद्घाटन करणार आहेत.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!