Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : जगातील प्रमुख १०० व्यक्तींमध्ये भारतातील तिघांचा समावेश , पंतप्रधान मोदी देशातील तिसरे प्रभावशाली पंतप्रधान

Spread the love

नवी दिल्ली : टाईम साप्ताहिकाकडून दरवर्षी प्रमाणे घोषित केल्या जाणाऱ्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पीएम मोदींच्या टाइम प्रोफाइलमध्ये असे म्हटले आहे की, स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या ७४ वर्षांमध्ये तीन प्रमुख नेते होते. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.

तर ममता बॅनर्जी या ६६ वर्षीय नेत्या राजकारणातील एका निर्भीड महिलानेता म्हणून पुढे आल्या असल्याचे टाईमने म्हटले आहे. या यादीत अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अ‍ॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन तसंच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे. याशिवाय एलोन मस्कचे नावही ‘इनोव्हेटर्स’मध्ये समाविष्ट आहे. पुतिनविरोधी कार्यकर्ते अलेक्सी नॅव्हलनी आणि रशियात अटक झालेली गायिका ब्रिटनी स्पीयर्स यांचा प्रभावशाली व्यक्तींच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!