Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ओबीसी आरक्षणावरून भाजपचे राज्यभर आंदोलन

Spread the love

मुंबई : भाजपच्या वतीने बुधवारी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष व खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार संजय कुटे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, गोपीचंद पडळकर, खासदार रामदास तडस, सुनील मेंढे यांच्यासह पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत न केल्यास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनात देण्यात आला.

निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला, नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात वेळेत सांख्यिकी तपशील (इम्पिरिकल डेटा) सादर केला असता, तर ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहिले असते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली व लढा तीव्र करण्याचा इशारा दिला.

भाजपचे आंदोलन म्हणजे नाटक

दरम्यान राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे आंदोलन म्हणजे नाटक आहे. मुळात ओबीसींच्या आरक्षणाचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकार मारेकरी असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याची टीका पटोले यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी असून ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

औरंगाबादेतही जोरदार आंदोलन

औरंगाबाद शहरातही  भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुध डेअरी सिग्नल चौकात, चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी केले या वेळी आ.अतुल सावे ,शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवीण घुगे,बस्वराज मंगरूळे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणिस सविता कुलकर्णी ,यांची प्रमुख उपस्थिती मध्ये हे आंदोलन झाले. यावेळी पोलिस व आंदोलकांची झटापट झाली, त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केले,आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, या घोषणा देण्यात आल्या.

या वेळी भाऊराव देशमुख,सरचिटणिस राजु शिंदे,समिर राजुरकर,शिवाजी दांडगे,राजेश मेहता, अनिल मकरिये,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे,आणुसुचित मोर्च प्रदेश सरचिटणिस जांलिदंर शेंडगे,डॉ.राम बुधवंत,महिला मोर्च शहर अध्यक्ष आमृता पालोदकर,मंडल आध्यक्ष सागर पाले,प्रविण कुलकर्णी,अजय शिंदे,संजय चौधरी,लक्ष्मीकांत थेटे,आरुण पालवे,शंकर माहत्रे,मनोज भारस्कर,आशोक दामले,मनिषा मुंडे,मनिषा भनसाली,प्रमोद राठोड,रामेश्वर भादवे ,दीपक ढाकणे, बालाजी मुंडे,संजय बोराडे, हाफिज शेख, जगदिश सिद्ध,अरविंद डोणगावकर,विवेक राठोड,रामचंद्र नरोटे,दौलत खान पठान,धनंजय कुलकर्णी,दिव्या मराठे,संग्राम पवार,धंनजय पालोदकर,मोहन आघाव,चंद्रकांत हिवराळे,लक्ष्मण कुलकर्णी,ज्ञानेश्वर बोरसे,बालाजी मुंडे,नितिन चिते,सागर निलकंठ,कुणाल मराठे,विजय वडमारे,साधना सुरडकर,योगेश वाणी,पुजा सोनवणे,आदि कार्यकत्यांना पोलिसांनी अटक केली.व नंतर सोडून दिले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!