Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : उत्तर प्रदेशात रिपाइं -भाजप युतीचा रामदास आठवले यांचा सल्ला , १२ जागांची मागणी

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला दिला आहे. बहुजन समाज पार्टीला धक्का देण्यासाठी भाजपाने आरपीयआसोबत मिळून निवडणूक लढली पाहिजे असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. या युतीत भाजपाने आरपीआयला १० ते १२ जागा द्याव्यात अशी त्यांची मागणी आहे.

“भाजपाने आरपीआयशी युती करुन आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवावी. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा दिल्या पाहिजेत. मी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

रामदास आठवले यांनी यावेळी रॅलीची घोषणादेखील केली. २६ सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार असून जवळपास ७५ जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “आरपीय (आठवले) २६ सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार आहे. ७५ जिल्ह्यांमध्ये ही रॅली जाणार आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!