Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात सिंगल डोस कोरोना लस स्पुटनिक लाईटला केंद्राची मंजुरी

Spread the love

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र केंद्र सरकराने आता सिंगल डोस कोरोना लस स्पुटनिक लाईटला आपत्कालीन मंजुरी दिली असल्याचे वृत्त असून भारतात या या लसीच्या ट्रायलला प्रारंभ होणार आहे.स्पुटनिक लाईट ही स्पुटनिक V चे पुढील व्हर्जन आहे, अशी माहिती याआधी रशियाने दिली होती.

भारतात रशियन लस देण्यासाठी हैदराबादमधील डॉ. रेड्डी कंपनीने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडसोबत करार केलेला आहे. स्पुटनिक V नंतर स्पुटनिक लाईटलाही भारतात मंजुरी मिळवण्यासाठी या कंपनीने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. भारताच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC) या लसीच्या ट्रायलला मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने या लसीच्या ट्रायलला मंजुरी दिली असून आता या लसीचे भारतात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल होणार आहे.

जुलैमध्ये या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागण्यात आली होती. पण केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन, CDSCO) तज्ज्ञ समितीने ही मागणी नाकारली होती. भारतात या लसीचे ट्रायल झाले नाही, त्यामुळे याला परवानगी नाही देऊ शकत असे समितीने सांगितले होते. आता या लशीच्या ट्रायलला परवानगी मिळाली आहे.

मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार RDIF सांगितलं, सिंगल डोस स्पुटनिक लाईटचे ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली. लस दिल्यानंतर २८ दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस ७९.४% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आले आहे. यात ७,००० लोकांचा समावेश होता. या लशीचा एक डोस प्रभावी असल्याचे रशियाने म्हटले आहे. या लशीच्या एका डोसची किंमत १० डॉलर्स म्हणजे ७३७ रुपयांपेक्षाही कमी आहे. या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली तर कोरोनाविरोधी लढ्यात ही लस महत्त्वाची ठरेल.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!