Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : पोलिसच बनला भक्षक , पुतणीवरच केले लैंगिक अत्याचार

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसात वाहतूक शाखेत कार्यरत हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या काकानेच तिच्यावर स्वतःच्या पुतणीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. काकाच्या या जाचाला कंटाळलेल्या मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या पीडितेने रविवारी संध्याकाळी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी तिला वाचवले. तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिलेच्या तक्रारीच्या आधारे खाकी वर्दीतील नराधम पोलीस काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद कुमार यांनी दिली आहे.

आपल्या तक्रारीत या पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, जानेवारी २०१९ साली या २५ वर्षीय महिलेच्या काकाने तिच्या कुटुंबाला अलाहाबादला कुंभमध्ये येण्याचं आमंत्रण दिले होते. त्यांच्या या मुक्कामादरम्यान तिच्या काकाने तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिला एक कोल्ड्रिंक दिले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ शूट केला. या पीडित महिलेने पुढे असेही सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून तिच्या काकाने अलाहाबाद आणि कानपूरमध्ये तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आहे.

ब्लॅकमेल करण्यासाठी दुसरा व्हिडिओ, मारहाण आणि धमकी

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना डीसीपी प्रमोद कुमार म्हणाले की, “जेव्हा तिच्या काकाला कळले की,  ती गर्भवती आहे तेव्हा त्याने तिला गर्भपाताची गोळी दिली.” इतकेच नव्हे तर रविवारी आरोपी आणि त्याचा मुलाने पीडित महिलेला पुन्हा कानपूरच्या चाकेरी परिसरातील एका खोलीत नेले. तिथे तिला आणखी ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांनी तिचा दुसरा व्हिडिओ बनवला. यावेळी जेव्हा महिलेने प्रतिकार केला तेव्हा त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला गंभीर परिणामांची धमकी दिली. त्यांच्या तावडीतून सुटून, पळून गेल्यानंतर या महिलेने सर्वप्रथम पोलिस हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला आणि त्यानंतर नदीत उडी मारली. पण, पीआरव्ही जवानांनी तिला वाचवले.

दरम्यान या प्रकरणात संबंधित  वाहतूक पोलिस जमादार आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, दंडाधिकाऱ्यासमोर पीडित महिलेची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित केलं जाईल असे  डीसीपी (वाहतूक) बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितले आहे. त्याचसोबत, पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल असेही ते म्हणाले.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!