Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : किरकोळ कारणावरुन खून,गुन्हेशाखेकडून आरोपी अटक

Spread the love

औरंगाबाद :  किरकोळ कारणावरुन खून करणार्‍या दोघांना गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या.पुढील कारवाईसाठी सातारा पोलिसांच्या हवाली केले. विकास रहाटवाड, संदीप मुळेकर दोघेही रा.कांचनवाडी अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर महेश दिगंबर काकडे (१८) असे मयताचे नाव आहे.विकास हा हाॅटेलवर काम करतो. तर संदीप सेंटरिंग चे काम करतो.आरोपींनी काल शनिवारी दुपारी ४च्या सुमारास मयत महेश यास दारु पिण्यास पैशे मागितले पण महेश काकडे ने नकार देताच रहाटवाड ने त्याचे केस धरुन भिंतीवर डोके आपटले तर मुळेकरने डोक्यात विटकर मारली या मारहाणीत महेश चा मृत्यू झाला.

या प्रकरणी खबर्‍याने गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना माहिती देताच. पीएसआय शेळके हे एएसआय नंदकुमार भंडारी, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख यांच्या सह घटनास्थळी पोहोचले.काही तासातच त्यांनी वरील आरोपींना अटक करुन सातारा पोलिसांच्या हवाली केले. या कारवाईत सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळोखे व पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांचे मार्गदर्शन लाभले.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिस करीत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!