Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ

Spread the love

गांधीनगर : अखेर भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. भूपेंद्र पटेल हे राज्याचे १७ वे मुख्यमंत्री झाले आहे. पक्षाने नियोजनानुसार आज फक्त भूपेंद्र पटेल यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. अमित शहांनी पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावर भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन केलं. तर पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात भाजपकडून मंत्रीपदासाठी नेत्यांची नाव निश्चित झाल्यानंतर येत्या काही दिवसांत पटेल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाही शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहा यांनी त्यांचं मंचावरच अभिनंदन करून त्यांना शुभेच्छाही दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे गुजरातचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे कि , मी भूपेंद्रभाई यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. पक्षाची कामे असोत किंवा प्रशासनाची किंवा जनतेची सेवा करण्याची कामे असोत भूपेंद्रभाई हे झोकून देऊन काम करतात. यामुळे भूपेंद्रभाईंच्या नेतृत्वात गुजरातचा आणखी जोमाने विकास होईल हे नक्की. पंतप्रधान मोदींनी गुजरातीसह इंग्रजीमध्ये ट्वीट करून भूपेंद्र पटेलांचं अभिनंदन

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आणखी एका ट्विटद्वारे विजय रुपानी यांचेही कौतुक केले असून त्यांनी म्हटले आहे कि , आपल्या ५ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गुजरातसाठी अथक परिश्रम घेतले. समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले . अनेक नागरिकांना त्यांनी जोडले. जनतेच्या सेवेसाठी ते पुढच्या काळात अशा प्रकारे काम करत राहतील हा आपल्याला विश्वास आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!