Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratPoliticalUpdate : गुजरातमध्ये चाचाललंय काय ? अमित शहा यांच्या सहमतीने घडताहेत खलबते !!

Spread the love

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल अचानक राजीनामा दिल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. आता नवा मुख्यमंत्री कोण होणार, कोणाला मंत्रिपदातून डच्चू मिळणार याची चर्चा जोरात सुरु आहे. दरम्यान गुजरातचा नवा कारभारी घोषित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहमतीनेच सर्व चर्चा घडत असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या धोरणानुसार अलीकडच्या काळात रूपाणी हे चौथे मुख्यमंत्री आहेत या आधी भाजपने कर्नाटक आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचेही राजीनामे घेतले आहेत. 

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नरेंद्र तोमर भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून गुजरातला भेट देणार आहेत. भाजपाचे सर्व आमदार केंद्रीय निरीक्षकांसह बैठकीला उपस्थित राहतील. नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. याआधी बी एल संतोष यांनी पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा आणि प्रदीपसिंह जडेजा, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप सिंह वाघेला आणि राजूभाई पटेल आणि विधानसभेतील पक्षाचे मुख्य व्हीप पंकज देसाई यांची भेट घेतली होती.

विशेष म्हणजे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अहमदाबाद येथे जागतिक पाटीदार समाजाच्या सरदार धामचे उद्घाटन केले. त्यानंतर  भाजपाचे संघटन मंत्री बी एल संतोष गांधीनगर येथे पोहोचले आणि त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि राज्य प्रभारी रत्नाकर यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत भेट घेतली. आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना  मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

या बदलामागे सांगण्यात येते कि , मुख्यमंत्री  विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही,असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळ‌ता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपानी यांना हटविण्यात आले,  ऑगस्ट २०१६ मध्ये  आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून विजय रुपाणी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यामुळे पटेल समुदाय नाराज झाला होता.

आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक

दरम्यान विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. काही केंद्रीय मंत्री गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचेही सांगितले जाते. भावी मुख्यमंत्री म्हणून विद्यमान केंद्रीय अरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व उपमुख्यमंत्री नितीन पटेल, विद्यमान मंत्री आर. सी. फालदू, दादरा-नगरहवेली, लक्षव्दीपचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांची नावे आघाडीवर आहेत. मनसुख मांडवीय यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री केले. राज्यसभेचे दोनदा सदस्य राहिलेल्या मनसुख मांडवीय यांना २०१२च्या विधानसभा निवडणुकांत भाजपाने उमेदवारी नाकारली होती. २००७ साली ते विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जिंकले होते. मांडवीय हे पटेल समाजातील आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर परीक्षा घेऊनच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. मनसुख मांडवीय हे वादग्रस्त नसलेले, साधे राहणीमान असलेले नेते आहेत. त्यांचे नाव कोणत्याही उद्योगसमुहाशी जोडले गेलेले नाही.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!