MumbaiCrimeUpdate : साकीनाका बलत्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : गृहमंत्री

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी सरकार हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीही  गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, मुंबईतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisements

मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी मयत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी राज्य सरकार हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर इथे दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली असून त्यांनीही या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Advertisements
Advertisements

समाजातील अपप्रवृत्ती चिंताजनक -भुजबळ

तर मुंबईतील साकीनाका सामूहिक बलात्काराची घटना मनाला यातना आणणारी आहे. या घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ऐकून धक्का बसला असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविला जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ‘राज्यात महिलांच्या अत्याचाराबाबत कठोर कायदे तरी अशा घटना घडतात समाजात अपप्रवृत्ती वाढते आहे. ही बाब चिंताजनक आहे .या विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सारख्या वकिलांची नियुक्ती करून आरोपींना कठोर शासन करू, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून शिक्षिकेवर पुण्यात बलात्कार

दरम्यान मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, पुण्यात आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरीतील  एका व्यक्तीनं पोलीस अधिकारी   असल्याचं सांगत शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार  केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित शिक्षिकेचे अश्लील फोटो  देखील काढले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. विकास अवस्थी असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. आरोपी विकास अवस्थी यानं निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचं सांगत पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. पीडित शिक्षिकेनं नराधम आरोपीचा विरोध केला असता, ‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन, मी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे. माझं कोणीही काही करू शकत नाही, अशी धमकी दिल्याचंही पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

अमरावतीमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार , गर्भवती झाल्याने पीडितेची आत्महत्या

अमरावतीमध्येही बलात्कारातून गर्भवती राहिल्याने  अमरावतीतील एका अल्पवयीन मुलीने  आत्महत्या  केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित तरुणीवर तिच्याच गावातील एकानं बळजबरी करत बलात्कार केला होता. बदनामीच्या भीतीनं पीडितेनं या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. यानंतर आरोपीनं जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अनेकदा बळजबरी केली आहे. यातूनच पीडित युवती ७महिन्यांची गर्भवती राहिली होती.

आपलं सरकार