Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना , मुख्यमंत्र्यांनी केली हि प्रार्थना…

Spread the love

मुंबई : राज्यात आज धूम धडाक्यात गणरायाचे आगमन झाले . ठिकठिकाणी गणेश भक्तांनी  उत्साहवर्धक वातावरणात श्रींची स्थापना केली . मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीही श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.गणरायाला विघ्नहर्ता असे  म्हणतात. तो हे संकट कायमचे  दूर करेल अशी मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या निमित्ताने बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथे  जिथे  मराठी माणूस आहे तिथे  अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतो. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असे  चित्र असायचे . मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असले  तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचे  कर्तव्य आहे. तसेच कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटद्वारे  देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, आपल्या ट्विटमध्ये  रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे की, ‘गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना शुभेच्छा. माझी इच्छा आहे की, विघ्नहर्ता गणेश कोरोनाविरूद्ध आमचे प्रयत्न यशस्वी करत सर्वांना आनंद आणि शांतीचा आशीर्वाद लाभो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शहा , राहुल गांधी . ममता बॅनर्जी यांच्याही शुभेच्छा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  खास मराठीतून ट्वीट करत महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये  ‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!’, असे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मराठी बरोबर  हिंदीतूनही ट्वीट करत भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी , भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी श्री गणेश चुतर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या देशाच्या प्रगतीतील सर्व विघ्न दूर होऊ दे, असे  साकडे राहुल गांधींनी ट्वीट करत गणपती बाप्पाला घातले आहे. तर  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही इंग्रजी बरोबरच मराठीतून ट्वीट करत महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!