IndiaNewsUpdate : मोठी बातमी : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

Advertisements
Advertisements
Spread the love

गुजरात : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. भाजप नेते विजय रुपानी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजय रुपाणी गुजरातमधील राजकोट पश्चिम विधानसभेचे आमदार असून २०१६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची सूत्रे  स्वीकारली होती. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Advertisements

विजय रुपाणी  यांच्या राजीनाम्यानंतर  भाजपच्या सर्व आमदारांना अहमदाबादला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीतच गुजरातच्या नवीन सीएमची घोषणा होऊ शकते. तूर्तास नितीन पटेल, मनसुख मांडवीया, पुरुषोत्तम रुपाला यांची नावे चर्चेत आहेत. आज रात्री विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावली जाऊ शकते. ही बैठक गुजरात भाजप मुख्यालयात होणार  असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असणारे रुपाणी  हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर १९७१ साली जनसंघात प्रवेश केला होता. यापूर्वी ते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर रुपाणी म्हणाले गुजरातच्या विकासाची ही यात्रा नव्या नेतृत्वा वाढायला हवी, यासाठी मी राजीनामा दिला आहे. पार्टीकडून जी जबाबदारी मला सोपवण्यात येईल ती मी पार पाडेन. गेली निवडणूक आणि पोटनिवडणुकीत जनतेने मोठे सहकार्य मिळाले आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. गुजरात भारतीय जनता पार्टीने गेल्या ५ वर्षांसाठी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती आणि मी माझे काम प्रामाणिकपणे केले. पक्षाकडून आम्हाला जबाबदारी दिली जाते, आणि ती आम्ही योग्य प्रकारचे निभावतो.

आपलं सरकार