Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यातील ८ जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही , ४ हजार १५४ नवे रुग्ण

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ४ हजार १५४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ४ रुग्ण ५२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा खूपच दिलासादायक आहे. राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्याही घटली आहे. तर बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे ८ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण  आढळून आला नाही. 

दरम्यान,राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील करोना प्रादुर्भाव सध्या आटोक्यात दिसत असला तरीही सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास पुन्हा एकदा रुग्णवाढीचा धोका आहे. त्यामुळे अनेक भागात प्रशासनाने जमावबंदीसारखा कठोर निर्णय घेतला आहे.

राज्यात काल सक्रिय रुग्णांचा आकडा ५० हजार पार गेला होता तर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली होती.परंतु गेल्या २४ तासात नोंदीनुसार बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा ५० हजारच्या खाली अली असल्याचे दिलासादायक वृत्त आहे. दरम्यान धुळे, हिंगोली, परभणी, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या आठ जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९९,७६० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. मात्र राज्यात आज ४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५७,०२,६२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९१,१७९ (११.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९६,५७९ व्यक्ती होम क्वारन्टाईनमध्ये आहेत, तर १,९५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाईनमध्ये आहेत.

राज्याची आजची कोरोनाची परिस्थिती

उपचार घेत असलेले रुग्ण – ४९,८१२

आज आढळलेले नवे रुग्ण – ४१५४

मृत्यू झालेले रुग्ण – ४४

बरे झालेले रुग्ण – ४५२४

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!