Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आज बैठक

Spread the love

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.  दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हि बैठक होत आहे.  या बैठकीत राज्यातील विविध राजकीय घडामोडी, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  राज्यात येत असलेल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता राज्यातील  प्रलंबित नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका, महामंडळांच्या नेमणुका यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान , काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कोणत्याही निवडणूक सरकारने थांबवू नये असे वक्तव्य केले आहे तर मुख्यमंत्री कोरोना काळात कुठलीही जोखीम घेण्यास तयार नाहीत.  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज निवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली आहे.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची संमती मिळाली तर लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये १० पालिकांची मुदत संपणार आहे तर १०० नगरपालिकांची मुदत संपत आहे. मात्र राज्यातील  कोविडची परिस्थिती आणि ओबीसी आरक्षणाचा गुंता लक्षात घेता या सर्व निवडणूक निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व स्थानिक निवडणुका या फेब्रुवारी किना मार्चमध्ये होतील हे निश्चित झाले आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह १७ महानगर पालिका, २७ जिल्हा परिषदा ३०० नगरपालिका, २९५ पंचायत समित्या आणि २१ जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे, एका प्रकारेही मिनी विधानसभेची निवडणूक समजली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सर्व नेते आणि मंत्र्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज निवडणुकीत ज्या ठिकाणी आवश्यक लागेल अशा ठिकाणी एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत  आहे. त्यामुळे या निवडणुकींच्या दृष्टीने शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!