Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ दोषमुक्त, म्हणाले ‘सत्य परेशान होता है पराजित नही’…

Spread the love

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोषमुक्त करण्यात आले आहे. या संदर्भातील निकाल दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्य परेशान होता है पराजित नही’ अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. छगन भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले  असून  यामध्ये समीर भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांनाही  दोषमुक्त करण्यात आले आहे.


महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळण्यात आले आहे. आपले नाव या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी विनंती करणारी याचिका भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देत सत्र न्यायालयाने भुजबळांना दोषमुक्त केले. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केल्याने त्यांना हा एक मोठा दिलासा आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात सर्वप्रथम एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात छगन भुजबळ याची कारागृहात देखील रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणात भुजबळ यांना २०१६ ते २०१८ या कालावधीत छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांना ४ मे २०१८ मध्ये भुजबळांना जामीन मंजूर झाला

या निकालावर बोलताना भुजबळ यांनी म्हटले आहे कि , कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत हे आम्ही यापूर्वीही सागत होतो, मात्र आता न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या बांधकामात कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळालेला नाही. या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. मात्र, गणेशोत्सवापूर्वी आमच्यावरील हे संकट दूर झाले.

सर्वांचे मानले आभार

दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर न्याय मिळाल्याचे समाधान झळकत होते. शायरीच्या अंदाजात भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भुजबळ म्हणाले, ‘साजिशे लाखो बनती हैं, मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाऐं है, जो उन्हे मुक्कमल नहीं होने देती’. कितीही कटकारस्थान केले तरी थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरचे हे विघ्न दूर झाले आहे, असे सांगतानाच त्यांनी आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांचेही आभार मानले. त्याच प्रमाणे मंत्रिमंडळात घेतल्याप्रकरणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. अतिशय विनम्रपणे आम्ही या सत्याचा स्वीकार करत आहोत. दरम्यान कोणाच्याहीबद्दल आमच्या मनात द्वेष नाही, असेही भुजबळ या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाले.

ज्यांना हायकोर्टात जायचे आहे त्यांनी खुशाल जावे

महाराष्ट्र सदन प्रकरण जगभर गाजलं. जे महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बांधलं गेलं त्याचा वापर अनेक राजकीय पक्ष करत आहेत. अंधेरी आरटीओ ऑफिस पण तसेच बनवण्यात आले . कंत्राटदाराला एक फूट जमीन किंवा एफएसआय मिळालेला नाही. ८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. जनतेच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो.आमचा न्यायव्यवस्थेवर पर्ण विश्वास आहे. आज दु:खाचा पाढा वाचणार नाही, काही लोक अजूनही मला शांतपणे झोपू देणार नाही असेही भुजबळ म्हणाले. दरम्यान ज्यांना हायकोर्टात जायचे आहे त्यांनी खुशाल जावे असे म्हणत छगन भुजबळ यांनी अंजली दमानींया यांना उत्तर दिले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!