Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CricketNewsUpdate : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा , मुंबईतून सहा जणांचा समावेश

Spread the love

पाकिस्तान विरुद्धची संभाव्य भारतीय टीम

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल/इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.


मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय टीममध्ये आर. अश्विनचे 4 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. 15 सदस्यीय टीममध्ये 6 स्पेशालिस्ट बॅट्सम, तीन ऑल राऊंडर, तर तीन-तीन स्पिनर आणि फास्ट बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट टीम पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शेवटची टी 20 लढत 2016 वर्ल्ड कपमध्ये झाली होती. त्या मॅचमध्ये टीम इंडियाने  6 विकेट्सने  विजय मिळवला होता. दोन्ही टीममध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये आजवर 5 लढती झाल्या आहेत. या सर्व लढतीमध्ये भारतीय टीम विजयी झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवर 8 टी 20 सामने झाले असून त्यापैकी 7 वेळा टीम इंडिया जिंकली आहे. वन-डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये मिळून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 17 सामने झाले असून त्यापैकी 14 वेळा टीम इंडिया विजयी झाली आहे.

सर्वांच्याच जागा निश्चित

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीम पाकिस्तान विरुद्धचा हा रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या निर्धारानं मैदानात उतरेल. या मॅचमध्ये फॉर्मात असलेल्या 11 खेळाडूंना मैदानात उतरवण्यात येईल. यामध्ये काही जणांच्या जागा निश्चित आहेत. ओपनिंग बॅट्समन म्हणून रोहित शर्माची जागा नक्की आहे. तर दुसऱ्या जागेसाठी केएल राहुल आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा असेल. या दोन्ही खेळाडूंनी मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये 500 पेक्षा जास्त रन काढले आहेत. या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात इशान किशन फॉर्मात नव्हता. तर राहुलनं 7 मॅचमध्ये 4 अर्धशतकासह 331 रन काढले आहेत. इंग्लंड दौऱ्यावरही राहुलनं चांगली कामगिरी केली आहे. मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांची जागा नक्की आहे. तर रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे ऑल राऊंडर म्हणून खेळतील. फास्ट बॉलिंगची जबाबदारी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहवर असेल. तर स्पिनर म्हणून अश्विन आणि वरुण चक्रवर्तीचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.

टीम इंडियाने  2007 नंतर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. तसेच 2013 नंतर एकदाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेले  नाही. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारताला आजवर एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये विराटच्य़ा कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. हा वर्ल्ड कप भारतामध्ये होणार होता. पण, कोरोना महामारीमुळे तो यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे  यजमानपद बीसीसीआयकडेच आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!