Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : कोरोनाचे लहान मुलांमध्ये वाढते प्रमाण , अधिक काळजी घेण्याची गरज

Spread the love

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांच्या संख्येत महिन्याभरात तब्बल ४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या काळात ११ वर्षावरील १८ हजार ४१३ बालकांचा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सरकारने १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बालकांसाठीची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. अशात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत लहान मुलांची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. सोबतच सणासुदीच्या काळात रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य विभागाने दिले माहितीनुसार जुलै महिन्यापर्यंत राज्यात १० वर्षाखालील २ लाख बालकांना तर ११ वर्षावरील ४ लाख ६३ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच यात मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ६ सप्टेंबरला समोर आलेल्या आकडेवारीनुसार, १० वर्षाखालील ६ हजार ७३८ बालकांना नव्याने कोरोनाची लागण झाली. यामुळे बालकांच्या बाधित होण्याच्या प्रमाणात ३.३६ टक्क्यांची वाढ झाली. तर, ११ वर्षांवरील बालकांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आलं. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ११ वर्षावरील १८ हजार ४१३ मुलं कोरोनाबाधित झाल्याचे निदर्शनास आले. या वयोगटातील बाधित मुलांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान राज्यातील परिस्थितीचा विचाप केल्यास महाराष्ट्रात आतापर्यंत २० वर्षाखालील ६ लाख ८८ हजार २१८ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २५ हजार १५१ मुले गेल्या महिनाभरात नव्यानं बाधित झाले. महाराष्ट्रात ११ ते २० या वयोगटातील मुलांची संख्या सुमारे २ कोटी १६लाख इतकी आहे. आतापर्यंत यातील ४ लाख ८१ हजार ४६२ मुलांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. या वयोगटातील एकूण कोरोनोबाधितांचं प्रमाण हे २.२३ टक्के इतकं आहे. हेच प्रमाण दहा वर्षांखालील बालकांच्या बाबतीत ३.१८ टक्के तर ११ वर्षावरील मुलांच्या बाबतीत ७.४२ टक्के इतकं आहे. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येत १० टक्के बालकांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!