AurangabaNewsUpdate : पोलिस चालकपदासाठी परिक्षा, ५ काॅपीबहाद्दरांवर गुन्हा, दोघांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – पोलिस चालक पदासाठी बुधवारी झालेल्या लेखी परिक्षेत सकाळी १० ते ११ च्या दरम्यान सातारा आणि सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात पाच काॅपीबहाद्दरांच्या विरोधात शासनाच्या फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून वृत्त हाती येईपर्यंत तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. राहूल राठोड (२३) आणि सतीष राठोड अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Advertisements

या आरोपीना सिडको औद्योगिक पोलिसांनी अटक केले. तर एका अल्पवयीन मुलुसह पूजा दिवेकर व रणजित राजपूत यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कूल माध्यमिक शाळेत परिक्षा केंद्र होते. तर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयटी महाविद्यालयामधे दुसरे परिक्षा केंद्र होते. आरोपींच्या ताब्यातून ब्लू टूथ, मख्खी डिव्हाईस, कॅमेरा मोबाईल फोन असे साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे व सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागरे व शेवाळे करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार