Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४ हजार १७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Spread the love

मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार १७४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ८९८ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार १५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार ५८१ इतकी होती. तर, आज ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ८६ इतकी होती. त्यामुळे आज झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत घट झाल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी घटल्याने असल्याने आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे.

आज राज्यात झालेल्या ६५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०८ हजार ४९१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतके झाले आहे.

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ८८० इतकी आहे. तर काल ही संख्या ४७ हजार ९२६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ३६४ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार ४९७ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ०६१ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार २६३ अशी वाढली आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार ९४४ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६६१ वर पोहोचली आहे.

मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ४,४३५

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार ४३५ इतकी आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८०, सिंधुदुर्गात ८३१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७९९ इतकी आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही. या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४२०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७८ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ७५ वर आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण असून धुळ्यात मात्र एकही रुग्ण नाही.

३,०७,९१३ व्यक्ती होम क्वारंटाईन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५३ लाख ३८ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७२ (११.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०७ हजार ९१३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!