Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : पंजशिरवर झेंडा फडकावल्याचा तालिबानचा दावा

Spread the love

काबूल : अखेर तालिबान आणि नॉर्दन आघाडीतील युद्धाचा आज शेवट झाला असल्याचे वृत्त असून तालिबानने आता पंजशीर खोरेही आपल्या ताब्यात घेतले असल्याची अधिकृत माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. मात्र तालिबान विरोधी गटाने वृत्तसंस्था एएफपीला माहिती देताना म्हटले आहे कि , तालिबान आणि नॉर्दन आघाडीचं युद्ध सध्या निर्णायक पातळीवर पोहोचले आहे. तसेच तालिबान आणि त्यांच्या सहकारी संघटनांसोबत युद्ध अद्याप सुरूच आहे. या युद्धातून तूर्तास माघार घेतली जाणार नाही. तसेच तालिबानने पंजशीर जिंकल्याचा दावा खोटा आहे.

तालिबानच्या म्हणण्यानुसार पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधात लढा दिला जात होता. पण आता पंजशीर हा त्यांच्या ताब्यात गेला आहे. पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवला असल्याचा दावाही तालिबानने केला आहे.

दरम्याान काल अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एका व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये सालेह यांनी सांगितलं होतं की, ‘दोन्ही गटाकडून पंजशीरमध्ये युद्ध सुरूच आहे. ‘आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात काही शंका नाही. तालिबान्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही अफगाणिस्तानसाठी शेवटपर्यंत लढत राहू. मी देश सोडल्याच्या बातम्या खोट्या आहेत हे लोकांना आश्वासन देण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे.’

यानंतर आज सकाळपासून तालिबानसमोर नॉर्दन आघाडीची पिछेहाट झाल्याची माहिती समोर येत होती. तसेच पंजशीरमध्ये तालिबानला कडवं आव्हान देणाऱ्या संघटनांनी आता शांततेत तोडगा काढण्याचा प्रस्ताव तालिबानसमोर ठेवला होता. पण तालिबाननं युद्धच सुरूच ठेवलं आहे. त्यानंतर आता पंजशीवरवर तालिबाननं पूर्णपणे ताबा मिळवल्याची घोषणा तालिबाननं केली आहे. तसेच तालिबाननं पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवत विजयी घोषणा दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!